बापानं पोरांना जेवू घातलं नाही तर पोरं खाणार काय याचा तरी विचार करा. याच बापावर जेव्हा एखादा मस्तवाल मंत्री "जा मर आत्महत्या कर" म्हणतो तेव्हा तळपायाची आग मस्तकात का जाऊ नये.
याच शेतकर्यांकडे "आपल्या पोरांची लग्न करण्या साठी पैसा आहे आणि आता गळे काढायला काय झालं" म्हणनार्यांच्या ढुंगंनावर सणसणीत लाथ मारावीशी वाटते. अरे तुम्ही आपल्या पोरांच्या लग्नावर श्रीखंड पुरीचे बेत झोडा आणि शेतकर्यांनी आपल्या पोराबाळांची लग्न केली की तुमच्या नाकाला मिरची झोंबते. अरे तुमची आहे प्रतिष्ठा आणि यांची पोरं काय रस्त्यावर पडली आहेत. किती रे नीच झालात.
एखादा पगार जेव्हा वेळेवर होत नाही आणि होम लोनचा हप्ता थकतो, हे जेव्हडं तिरहाइता साठी सामान्य आणि स्वता:साठी कर्मकठिण, हीच गत आहे शेतकर्याची. आपला समाजच सवेदना शून्य झाला आहे याचं ध्योतक आहे हे.
एखादा दिवस तळपत्या उन्हात, पावसात आणि थंडी वार्यात उघड्या आभाळा खाली आपल शरीर झिजवून बघा की राव, एसी च्या थंडगार हवेत ट्रेड मिल वर धावून घाम येण्याची वाट बघण्या परिस खरच कठीण आहे. जेव्हा उन्हा तान्हात काम करताना डोक्याच्या केसांमधून घामाची धार सरळ मणक्या वरुण माकड हाडा पर्यन्त ओघळते आणि ओघळताना ती स्वत:ची जाणीव करुन देते याला कष्ट म्हणतात. "today I work hard" म्हणताना आपल्या जिभेला लकवा का नाही मारत. रात्री अंथरुणावर पडल्यावर तोंडातून येणार्या उसास्यांची जाणीव, रात्री झोपयेण्या साठी दारूचे घोट रिचवणार्यांना कधीच होणार नाही.
येणार्या पानकाळ्या आधी शेतीची कामं पुरी होण्यासाठी हाडांचं पाणी करावं लागतं भाऊ. दिवसभर मातीत तुमच्या पेक्षाही लाख पटींचं "work hard" करावं लागतं. शेती म्हणजे काय असते हे पुढच्या पिकासाठी बी-बियाण्यासाठी पैशाची जमवाजमव केल्याशिवाय कळत नाही. शेतात काम करुन आल्यावर बाप / भाऊ / पोरगा जेव्हा हात पाय दुखतात म्हणून रात्रीतून कन्हत उठून बसतं, त्याच्या घरच्यांना विचारा शेती काय असते म्हणून. सुरुवात मशागत केलेल्या शेतीपासून होते, तो पर्यन्त शेतकर्यांचं शरीर हेच भांडवल असतं. त्या नंतर बी बियाण्यासाठी पैशाची जमावा जमाव, एकदा बियाण-रोपं यांची तजवीज झाली की मग पावसाची वाट बघायची. पाऊस वेळेवर झाला की पेरणी, त्यानंतर पावसनी हात दिला की मग पिकाची मशागत. हे एव्हडच नाही याप्रत्तेक टप्या वर निसर्गाचा लहारीपणा सहन कारायचा. खूप सार्या अवलंबित गोष्टी. एव्हड करूनही पीक उत्तम आलं तरीही बाजारभावाचं अवलंबित्वही आहेच की राव. थोडक्यात काय तर कसलीच निश्चिती नाही कधीही हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला जावू शकतो. तो तुमच्या ट्रेनच्या वेळे एव्हडाही निश्चित नाही किवा तुमच्या बँकेतल्या ठेवीच्या व्याजा एव्हडाही निश्चित नाही.
बागायतदार- धनदांडगे शेतकरी ही संज्ञाच पटत नाही. नगदी पीक घेणारे बागायतदार म्हणता तुम्ही, पण तुम्हाला माहीत आहे का उस तयार व्हायला सुद्धा १४ महिन्यांचा कालावधी लागतो. त्या साठि कारखान्या कडून बियाण उधारीवर घ्या, उभ्या पिकावर कारखान्या कडून कर्ज घ्यावं लगतं, त्याच्या खतासाठी आणि तणनाशकासाठी. किती धनदांडगे हे उस गेल्यावर येणार्या पैशाकडे बघून बोलू नका. कारखान्याचा / कृषि केंद्राच्या जमा खर्चात डोकावून बघा मग कळेल किती धनदांडगे. मी अजून त्यांच्या श्रमाचा मोबदला तर पकडलाच नाही. तो बघितला तर किती आत बत्त्याचा व्यवहार आहे हे लगेच कळेल. तुम्ही तयार होणार का ? बिनमोबदल्याचं काम करायला.
हाच शेतकरी सगळ्यात जास्त इमानदार म्हणून कारखान्यापासून सावकारापर्यन्त सगळेच याला कर्ज द्यायला तयार होतात. त्यांना माहीत आहे की, हा काही आपलं कर्ज बुडवणार नाही, स्वतचा जीव देयील पण आपलं कर्ज फेडील. तुमची किती पत आहे हे ऑनलाइन शॉपिंग करतानाच बघा की राव, वस्तु हातात मिळण्या आगोदरच पैसे तुमच्या अकाऊंट मधून निघालेले असतात.
"शेतकर्यांना कर्ज माफी दिलीच की !" म्हणनार्यांच्या पेकटात लाथ घालावी की यांच्यावर हसवं हेच कळत नाही. जरा जमिनीवर उतरा भाड्यानो, तेव्हा कळेल की किती कर्ज माफी मिळाली आणि किती जणांनी त्यांच्या मिळकतीतले पैसे परस्पर कापून/वळवून घेतले. कर्ज माफीतर शेतकर्यांनी मागितली नव्हतीच, ते तर राजकीय पक्षांचा क्रियाकर्म आहे.
शेतकर्याला फक्त हवाय हमी भाव, शेतीसाठी पुरेसं पाणी आणि पुरेसी वीज. अरे एमआरपी ठरविण्याचा हक्क तुम्ही दिला आहेना सर्वांनाच, तोच हक्क मागतोय न तो॰ ही कसली लोकशाही जिथे आपण निर्माण केलेल्या गोष्टीची कींम्मत ठरवण्याचाही अधिकार आपल्या कडे नाही. औषधं घेताना तुम्ही विचारता का कधी "एव्हडीच कींम्मत का?" म्हणून. मग शेतकर्यांना द्या की राव हमीभव. इंडस्ट्रियल एरिया, Special economy zone ठरवताना घेता न तुम्ही वीज, पाणी आणि रस्त्यांची काळजी. मग आमच्या शेतकर्यांनाही द्या न मूलभूत सोयी त्यांच्या शेतीसाठी.
अकीकडे म्हणायचे भारत शेती प्रधान देश आहे आणि त्याच वेळी शेतकरी नेहमी गुलाम राहील याची काळजी घ्यायची.
तुमचं अर्थशास्त्र घाला चुल्हित, उद्योजकांना कोट्यवधी रुपयाची कर्ज द्यायची आणि तीही दीर्घकालीन. त्यातली किती परत येतात त्याचा जमा खर्च तुम्हाला/आम्हाला चांगलाच माहीत आहे. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक SBI चे 11700 करोड bad loans आहेत. विजय मल्या 9000 करोड बुडवून परदेशात पळून गेला. हा पैसा काय तुमच्या बापाचा आहे?. ह्याच सर्वसामान्य माणसाचा आहे. त्यात हे शेतकरी सुद्धा येतातच. त्यांच्या साठी वेगळा न्याय आणि आमच्या शेतकर्यांसाठी वेगळा न्याय. शेतकरी किती पीक कर्ज घेतात याचा आकडा तरी सांगावं यांनी. एव्हडी हिम्मतच नाही यांची कारण संपूर्ण देशातल्या शेतकर्यांचा एकत्रीत आकडाही काहिशे करोड रूपायांवर जाणार नाही याची खात्री आहे. याच शेती व शेतकर्यांनी आपली अर्थ व्यवस्था टिकवली होती आणी आहे हे सोयिस्कर रित्या विसरण्यात आले आहे. या राष्ट्रीय बँका शेतकर्यांनीच उभ्या केल्या आहेत.
खरच कुणीतरी म्हणालय "शेतकर्यांसारख आयुष्यभराची कमाई उघड्या आभाळा खाली ठेवून बघा".
No comments:
Post a Comment