Friday, June 17, 2016

Akole Tourist Destination (Part-III)-प्रकाश-शलाखा- भंडारदर्‍याचा काजवा मोहोत्सव

वैशाख वणवा आपल्या अस्तित्वाचा दाखला पाना-फुलांवर, दगड धोंड्यांवर, पाला पाचोळ्यावर इतकेच काय तर गुरा-वासरांसहीत माणसाच्या चेहर्‍यावरही देत असतो. निसर्गाच्या प्रत्तेक घटकाला माहीत असतं, रात्री नंतर दिवस उजाडणारच आहे, फक्त रात्रीचा अंधार जायची वाट पहायची आहे. आपली सहनशीलता उजाडेपर्यंत शाबूत ठेवायची आहे. वैशाख वणव्यानंतरच जेष्ठातल्या पावसाळ्याचे आगमन होणार, त्यासाठी सृष्टी झपाटल्यासारखी पावसाची वाट पाहात असते. येणारा पाऊस आपल्या सोबत पाण्याबरोबरच उत्साह, आनंद आपल्याला मुक्तहस्ते भरभरून देणार असतो. झाडांच्या पानांवर साचलेली निराशेची धूळ एका क्षणात झटकून त्यांना नवाकोरा हिरवा शालू भेट देणार असतो. निसर्गातला जिवंतपणा, पक्षांच्या किलबिलाटासहित त्याच्या स्वछंदी बागडण्यातून सर्वत्र मोकळा आनंदी, ऊत्स्फूर्त जिवंतपणा भरून टाकणार असतो. निसर्गाला या येणार्‍या सृष्टीतल्या बदलाची जाणीव होते. त्यातील प्रत्तेक घटक येणार्‍या पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो. आपआपल्या परीने त्याच्या स्वागताची तयारी करत असतो. 
असाच एक चमत्कार सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये, रानावनात घडत असतो. ज्यावेळी आपण निद्राधीन असतो त्याचवेळी नभोमंडल जमीनीवर पांनाफुलांमध्ये अवतरलेलं असतं. वैशाख महिन्याच्या शेवटाला रात्रीच्या अंधारात काजव्यांचा थरार सुरू होतो. जुंगलात दमटजागी, पाण्याच्या जवळपास हजारो, लाखो किंवा कोट्यवधी काजवे जमा होतात.

लहानपणी शेतामध्ये काजव्यांचा मागून धावताना कित्तेक तास घालवलेत. तेव्हा एकटेदुकटे दिसणारे काजवे अखाद्या चहाच्या कपात पकडून गोळाकरायचे, कपावर उपरण्याचा एकपदरी पडदा बांधला की झाली तयार आमची वीजेरी. किती वेळा आणि किती वर्ष हा खेळलो असेल आता आठवत नाही. लहान पणी जेव्हडे काजवे दिसायचे तेव्हडेही काजवे आता गावी दिसत नाहीत, याची खंत असायची मनात. सहा वर्षापूर्वी रात्री दुचाकीवरून गावी जाताना अचानक माला शोध लागला  भंडारदर्‍याच्या काजवा मोहोत्सवाचा. तेव्हापासून प्रत्तेक वर्षी हा काजवा मोहोत्सव पहाण्यासाठी भंडारदर्‍याला जाणे होते.  
वैशाखसरताना भंडारदर्‍याच्या हवेतच बदल होत नाही तर निसर्गही कात टाकतो. चोहोबाजूंना मिट्टकाळोख पसरलेला असतो आणि काजव्यांच्या प्रकाश शलाखा रस्त्यावरून, झाडांवरून खाली दारीतून डोंगरावरून लुकलुकत असतात. भंडारदर्‍याच्या आदिवासी भागात अजूनही निसर्ग त्याच्या मूळ रूपात शाबूत आहे. ग्रीष्माच्या शेवटी आणि पावसाच्या सुरूवातीला इथल्या डोंगरदर्‍यांमद्धे काजव्यांची मोहमयी दुनिया अवतरते. रस्त्याच्या दुतर्फा काही विशीष्ठ झाडांवरच काजव्यांचा लयबद्ध चमचमाट चालू असतो. ही काजव्यांची वाढती संख्या येणार्‍या पावसाची वर्दी देतात. त्यांच्या संखेवरून निसर्गत:च येणार्‍या पावसाच्या तीव्रतेची कल्पनाही करता येते. वातावरणातील दमटपणा आणि आद्रता जशी जशी वाढत जाते तशी तशी काजव्यांची संख्या वाढत जाते. जणूकाही सर्व नभोमंडळ जमीनीवर अवतीर्ण झाल्याचा स्वर्गीय अनुभव येतो.
गाडीचे दिवे बंद करून फक्त यारस्त्यांवर मनसोक्त भटकायचे. या अग्निशिखा कधी तुमच्या डोक्यावरुन तर कधी आजुबाजुने स्वछंदपणे बागडत असतात. भान हरपून तुम्ही रात्रभर नुस्ते निशब्द फिरत असता आणी मनमुराद ही जमीनीवरची लोभसवाणी प्रकाशफुलं वेचत असता. हा अनुभव खरच मंत्रमुग्ध करणारा आहे. हा स्वर्गीय आनंद प्रत्तेकाने घ्यायलाच हवा. एकालयीत, तालासूरात निशब्द लुकलुकाट तुमच्या चोहोबाजूला चाललेला असतो, आपण त्याचे मुक साक्षीदार बनलेले असतो. गाडीचे दिवे उघडझाप करून पहा, हे काजव्यांचे दिवेही दिव्याच्या उघडझापीला त्यांच्या चमचमाटाने उत्तर देतात आणि तोही एका तालासुरात, फक्त तुम्हाला तो ताल-सुर कानाऐवजी तुमच्या नजरेने टिपता यायला हवा.अंधार्‍या रात्री गाडीचे दिवे बंद करून अकटेच या झगमगीत रस्त्यावरून रोंयल सफर करून बघा, तुम्ही कुणी स्पेशल असल्याचा अनुभव नक्कीच येणार. दुतर्फा नैसर्गिक दिव्यांचा झगमगाट आणी मधून आपली सवारी चालली आहे. एखाद्या परी कथेतील वर्णन ना!.  
भंडारदर्‍याच्या परिसरात अनेक किल्ले आहेत रात्रीत काजवयांच्या संगतीत आखादा ट्रेक तर करायलाच हवा. मागच्या वर्षी असाच हरिश्चंद्रगड उतरलो होतो काजव्यानसोबत, अप्रतिम अनुभव होता तो. पण हे काजवे कॅमेर्‍यात बंदिस्त करणे हे महा कर्म कठीण काम. 

काजवा हा "आरथ्रोपोडी" समुदायातला कीटक आहे. सुमारे दोन हजार जाती आहेत काजवयांच्या. प्रत्तेकाचे रंग रूप वेगळे, प्रत्तेकाच्या प्रकाशात फरक, कुणाचा कमी, तर कुणाचा जास्त. परंतु रंगात फरक जरी असला तरी हिरवट-पिवळसर प्रकाशाच्या छटाच तयार करतात हे काजवे. हा दमट वाटवरणात राहणारा जीव आहे, त्याची साधारण लांबी एक ते दीड सेंटीमेटर असते. काजव्यांच्या जीवनक्रम आणि फुलपाखराचा जीवनक्रम सारखाच, फक्त काजवे हे किटकभक्षी आहेत. आधी अंडी, मग त्यातून अळया बाहेर येतात आणी मग उडणारा झगमगणारा कीटक तयार होतो. काजव्यांच्या शरीरात मागील पोटाखालच्या भागात पारदर्शी आवरण असते, त्याला क्युटिकल म्हणतात. यातच प्रकाश देणारा घटक असतो. काजव्यांच्या प्रकाश देणार्‍या अवयवामध्ये / पेशींमध्ये "ल्युसिफेरीन" नावाचा घटक असतो. तोच त्यांच्या चमचमटाला कारणीभूत असतो. 
काजवयांचा प्रकाश हा थंड, शांत असतो. अंधार्‍यारात्री काजव्यांचे लुकलुकणे फारच मनमोहक दिसते. हे लुकलुकणे काजवयांच्या श्वासोछवासावर अवलंबून असते. जेव्हा कीटक श्वास सोडतो तेव्हा हा प्रकाश मंदावतो, पुन्हा श्वास घेताना प्रकाश प्रखर होतो. नर काजवा मादीपेक्षा थोडा प्रखर प्रकाश देतो, म्हणूनच मादी नराकडे आकृष्ट होते. काजवे हे किटकभक्षी आहेत म्हणून शेतकर्‍यांना त्यांचा उपयोगच होतो. पेरणीनंतर शेतात इतर कीटक अंडी घालतात त्यातून निघालेल्या अळ्या हे काजवयांचे खाद्य, त्याबरोबरच शेतात उपद्रव करणार्‍या गोगलगायाही यांचे मुख्य खाद्य असतं.
हा काजवा मोहोत्सव पाहायचा असेल तर मुंबईहून घोटीमार्गे सिन्नर रस्त्यावरून भंडारदर्‍याच्या रस्त्याला लागायचे, जर पुण्या वरुन यायच असेल तर आळेफाट्यावरुण संगमनेर, अकोले आणी मग भंडारदर्‍याला उतरायचे. तुम्ही रात्री येणार असाल तर हे काजवेच तुमच्या स्वागताला हजर असतात. एकदा भंडारदर्‍यात आलो की मग धरणाच्या जलाशयाला वळसा घालून मुतखेल, कोलटेम्भे, रतनवाडी, सांम्रद, घाटघर पर्यंतचा रास्ता रात्रभर भटकायचा. मग घाटघर वरुन उडदावणे, पांजरे करत शेंडीला मुक्कामाला यायचे.Wednesday, April 20, 2016

Akole Tourist Destination (Part-II)-Harishchandra Gad

Harishchandra Gad
  
KOKANKADA from Belpada
About Harishchandragad-
Location- Sahyadri Balaghat Mountan range - Tal. Akole, Dist. Ahemadnagar. (Eighteen miles south-west of Akelo).
Height - 1424 M

About five paths lead up to the hill two of which from Pachnai and Kotul can be regularly used by older days. The hill top, which is about three miles in diameter, is an irregular tableland.

Routs to reach to Harishchandragad
From Khireshwar- Tolarkhind
Grade - Moderate
Regular way used by trekkers is from Khubi phata next to malshej ghat. Khubi phata – Pimpalgaon joga dam wall – Khireshwar – Tolar Khind – Harishchandragad.
From khubi phata,  one has to take a 4-5 km walk on the wall of the dam called Pimpalgaon Jiga dam. The dam ends at Khireshwar village, and from here onwards a straight route trail goes towards Tolar khind. Around 1.5 hours are required to reach till Tolar khind from Khireshwar village. The end of the khind has a stone carving of a Tiger. After the khind, is a 100 feet easy rock patch, which has iron railings for the safety of trekkers. The climb on the rock patch then leads a straight way to Harishchandreshwar temple it took 1 hour, with small hills & streams in between.

From Khireshwar- Rajmarg
Grade- Difficult
Khubi phata – Pimpalgaon joga dam wall – Khireshwar – Nageshwar Temple- Balekilla – Harishchandragad
Rajmarga was the main route to ascend Harishchandragad a old age, but currently in bad condition,. This route follows the same path till Khireshwar village. From here, must go along the straight path and start ascending on the slopes of Kalshya dongar from the back side of Nageshwar Temple. The cliff that comes after the Kalshya dongar has to be ascended. The climb has rock crumbling and lot of scree with dangerous patches in between. After this tricky ascent, one joins the Tolar khind route after the rock patch.

From Pachnai
Grade- Simple
Rajur/Kotul- Pachnai– Harishchandragad
Pachnai is the simplest route to Harishchandragad and absolutely recommended for anyone of any age. From the Pachnai village, it takes around 2-2.5 hours to reach Harishchandragad. A guide is available at the Pachnai village if required.

From Kothale
Grade- Moderate
Kotul- Kothale– Bahiroba fort- Tolarkhind-Harishchandragad
Pachnai is the simplest route to Harishchandragad and absolutely recommended for anyone of any age. From the Pachnai village, it takes around 2-2.5 hours to reach Harishchandragad. A guide is available at the Pachnai village if required.
From Kotul transport facility available till Kothale. From Kothale trail strat towards Tolar khind,  one has to take walk around bhairoba fort towards Tolarkhind.  


From Nalichi Vaat
Grade- Difficult
Belpada- Left Nali of Kokankada - Way to Sadhale ghat – Harishchandragad
Nalichivaat is started from Belpada village it is base village of kokankada. Its most difficult rout to Harishchandragad. To the left of Konkan Kada are 3-4 channels that come down from the top. The channel to the extreme left is the Nalichi vaat. Here, trekking gear is required to ascend the rock patches as sometimes there is no slit available for having a grip. Hence, route is recommended strictly for the experienced trekkers.
This trek took total 10 to 15 hours. This rout will be joining to the sadle ghat way of Harishchandragad.

From Sadhle Ghat
Grade- Moderate
Belpada- Kelewadi – Sadhale Ghat – Harishchandragad

Trek is started from Belpada village to the Kelewadi village. From Kelewadi steep slope of Sadhle Ghat brings you on the top. Sadhle ghat is oldest trade route for local villagers.

Monday, April 18, 2016

Akole Tourist Destination (Part-I)

The Sahyadris provide a wide choice of outdoor and adventure to all lovers of outdoor life - the trekker, the climber and the nature lover. Sahyadri mountain range full of trekking locations and forts build by ancient age peoples/ rulers and fortified and maintained by Shivaji Maharaj situated along the western side Maharashtra. Trekking destinations in Maharashtra are one of the best outdoors recreational activity to do, Sahyadri Mountain ranges of Maharashtra has many excellent tourist destination and best monsoons getaways around Mumbai and Nasik specially Akole region in Ahemadnagar. Akole has pleasant and very romantic climate throughout the year, which makes it one of the green corridor, surrounded by rolling hills and lush green forest along with number of forts and trekking places.

Figure 1-Akole is a city and taluka in Akole tehsil of Ahmednagar district in the Indian state of Maharashtra. Akole is situated surrounded with the Sahyadri mountains of Western Ghats in India
Coming Monsoon, it’s time for Trekking and having fun in the rains in the midst of nature. A time all the Trekking enthusiasts wait for. It’s that time of the year where we wait for weekends just to discover a new trekking route, a new adventure, to have fun in the waterfalls on the trekking route, to have hot lemon grass tea, kanda bajiyas & butta on the trek & just embrace the nature. Here, some of best treks in Akole.
Forts
1.       Harishchandra Gad - (http://ran-kida.blogspot.in/2015/06/blog-post.html)
2.       Ratangad - (http://ran-kida.blogspot.in/2015/10/ratangad.html)
3.       Kalsubai peak
4.       AMK (Alang, Madan and Kulang gad) - (http://ran-kida.blogspot.in/2015/10/alang-madan-kulang-gad-trek.html)
5.       Kunjargad
6.       Kaladgad
7.       Patta Fort
8.       Pemgirigad
9.       Bitangad
10.   Sandhan Valley
11.   Muda/Gawaldev
12.   Pabargad
13.   Ghanchakkar
14.   Bhairavgad (Shirpunje)
15.   Aajobagad

Temples
16.   1. Amruteshwar – Ratanwadi
17.   2. Harishchandreshwar-Harishchandragad
18.   3. Sidhheshwar Temple- Akole
19.   4. Gangadhar Temple- Akole
20.   5. Narayaneshwar Temple- Kotul
21.   6. Tahakari Temple- Tahakari
22.   7. Hemadpanthi Temple- Sugao
23.   8. Mhaladevi Temple- Mhaladevi

Dams
24.   Bhandardara
25.   Randha Fall
26.   Nilwavde Dam

Rivers
27.   Pravara
28.   Mula
29.   Aadhala
30.   Mhalungi

Jungle Book


The Jungle Book - Mowgli......


I still remember I use to wake up early on Sunday just to watch Jungle book on DD National channel. It was must for all the children on Sunday 9:00 AM. Mowgli and his animal Kingdom. I never missed a single episode and that famous song written by Gulzar Sir " Jungle Jungle baat chali hai " along with most adorable sound of SHER KHAN (Voice given by Nana Patekar).


Thursday, April 14, 2016

फुफाटा

     कधीपासून बबन्या फुफाट्याकडं नीस्ता एकुलग्यावानी पघत बसला व्हता. दोन घटका व्हून गेल्या, पर ह्यो काय बुडाखालचा दगुड सोडाया तयार न्हायी. ऐन पानकाळ्यात फुफाट्यासगट वावटळी धुडगूस घालत्याल तर जीवाला घोर लागून ऱ्हायचाच.
      वरीसभरापासूनचा काळ नदरं म्होरून घसारला. तसा गाव कधीबी दुष्काळाचा बाधी न्हवता, तीन वरसापासून व्हत्याचं न्हवतं झालं. एक पीक हाताला घावलं नाय. मागल्या पानकाळ्यात तांबटाचा फड लय रगाट निघाला, अशी मोठाली तांबटं येका मुठीमंदीबी नाय घावायची. मोठ्या कवतीकानं जाळ्या भरूभरू तांबटं मार्केटात आनी गुजरीला पाठवून दिली. ऐनवक्ताला बाजार असा काय उठला की चार वरसात एव्हडा कमी भाव नाय पघितला. समदा बाजार लालभडक दिसाया लागला व्हता, सारा फड उखुड्य़ाचा धनी झाला. त्याच येळी दीड यकरात उसाचा फड धरला व्हता, उनकाळ्यातसुधा हिरीचं पानी पुरूनपुरून उस जगावला आनी उनकाळ्याच्या शेवटाला आभाळाचं प्वाट फाटलं, धडाधड पांढुरक्या गारा पडाय लागल्या. समदा उसाचा फड दिसात आडवा झाला, पर म्हणायला उंदरांची मातुर जत्रा साजरी झाली.

शेतकरी हा आमचा बाप आहे.

बापानं पोरांना जेवू घातलं नाही तर पोरं खाणार काय याचा तरी विचार करा. याच बापावर जेव्हा एखादा मस्तवाल मंत्री "जा मर आत्महत्या कर" म्हणतो तेव्हा तळपायाची आग मस्तकात का जाऊ नये.
याच शेतकर्‍यांकडे "आपल्या पोरांची लग्न करण्या साठी पैसा आहे आणि आता गळे काढायला काय झालं" म्हणनार्‍यांच्या  ढुंगंनावर सणसणीत लाथ मारावीशी वाटते. अरे तुम्ही आपल्या पोरांच्या लग्नावर श्रीखंड पुरीचे बेत झोडा आणि शेतकर्‍यांनी आपल्या पोराबाळांची लग्न केली की तुमच्या नाकाला मिरची झोंबते. अरे तुमची आहे प्रतिष्ठा आणि यांची पोरं काय रस्त्यावर पडली आहेत. किती रे नीच झालात.